10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती दिदी करणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगावात आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दिदी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत करताना मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केलेले पहिल्यांदाच पाहत आहे अशा शब्दात अजितदादा पवार यांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच दिशेने आपण प्रवास करूया असेही अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

अजितदादा पवार पुढे म्हणाले की असे वातावरण मी पहिल्यांदाच पाहत आहे.आज परिस्थिती वेगळी आहे. नैसर्गिक परिस्थिती चांगली नाही.सगळीकडे पाऊस सुरू आहे. तरीही गावातील महिला येथे आलेल्या आहेत. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं मोदींचं उद्दिष्टं आहे. आपण महाराष्ट्रात ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प करूया. महिलांवर जबाबदारी टाकली तर महिला जबाबदारी यशस्वी पेलू शकतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच दिशेने आपण प्रवास करूया असेही पवार यांनी सांगितले. जळगावातील कानकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून महिला पंतप्रधानांना भेटायला आल्या. तुमचा उत्साह पाहून तुम्हाला सलाम केला पाहिजे. राज्याने महिलांना मान दिला आहे. सन्मान दिला आहे. सक्षम केलं आहे. महिला सक्षम होत आहेत. आपणही काही योजना आणल्या आहेत.

सरकारी यंत्रणेचा गैरवापर – दुसरीकडे जळगावातील पंतप्रधानांच्या या लखपती दिदी कार्यक्रमाला शासकीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची टीका समाजवादी पार्टीचे नेते प्रताप होगाडे यांनी केली आहे. या कार्यक्रमासाठी अमळनेर येथील एसटीचा ताफा, तसेच शिक्षक, ग्रामसेवक,आशा वर्कर आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आल्याने त्यांचे मूळ कामावर याचा वाईट परिणाम होणार असल्याचे होगाडे यांनी म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!