अध्यक्षपदी शामभाई सावंत,सरचिटणीसपदी मसुरे सुपुत्र दीपक सावंत यांची निवड
मसुरे|वैभवी पेडणेकर : मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनची त्रैवार्षिक (२०२४-२७) कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी माजी आमदार शामभाई सावंत तर सरचिटणीसपदी मसुरे गावचे सुपुत्र दीपक सावंत यांची निवड करण्यात आली. शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या, तसेच मुंबईला राज्याचा दर्जा असलेल्या मुंबई शूटिंगबॉल (व्हॉलीबॉल) असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ ऑगस्ट् २०२४ रोजी पराग विद्यालय, भांडुप येथे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार श्री श्यामभाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेत त्रैवार्षिक (२०२४-२७) नवीन कार्यकारिणीची निवड बहुमताने करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष शामभाई सावंत, सरचिटणीस दीपक कृ सावंत,खजिनदार प्रफुल्लकांत वाईरकर,कार्याध्यक्ष जालंदर चकोर, उपाध्यक्ष मंगेश भोसले, रत्नदीप रावराणे,सहसचिव मिलिंद बिर्जे, प्रदीप वाघ,सदस्य श्रीकांत वाईरकर, महेश कदमदिलीप मालंडकर,सल्लागार : अशोक चव्हाण, पांडुरंग सुतार मुंबई व उपनगरात विभागवार राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करून क्रीडा युवकांना या खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. व्यावसायिक, शासकीय संघ नोंदणीकृत करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कंपन्याना विनंती करून संघनोंदणी करून घेतली जाईल. तसेच शालेय पातळीवर अधिकाधिक विद्यार्थ्यांना हा खेळ शिकविण्यासाठी ज्येष्ठ खेळाडू यांना त्या विभागीय शाळांमधे पाठविण्याचा प्रयोग करायला प्राधान्य देण्यात येईल. शालेय क्रीडापटूंना विशेष नैपुण्य गुण मिळण्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. मुंबईने राज्याला राष्ट्राला या खेळात खूप खेळाडू दिले, तेच गत वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न असतील.
क्रीडा प्रोत्साहना साठी एक नवीन प्रयोग म्हणून महिन्यातून दोन वेळा चार – सहा संघ निमंत्रित करून मिनी सराव स्पर्धा घेण्यात येईल. मुंबई नोंदणीकृत खेळाडूंना अपघाती विमा संरक्षण मिळवण्याचे प्रयास सुरू आहेत.
यावर्षी राष्ट्रीय मिल मजदुर संघ पुरस्कृत वार्षिक कामगार महर्षी स्व गं. द. आंबेकर स्मृती चषक, निवड चाचणी- मुंबई मर्यादित सचिव चषक, अखिल भारतीय अध्यक्षीय चषक तसेच मुंबई असोसिएशनच्या सहकार्याने, कोंकणातील मसुरे या क्रीडाप्रेमी गावात स्व. बाजीराव राणे स्मृती चषक या एका अखिल भारतीय भव्य स्पर्धेचे आयोजन या क्रीडावर्षात करण्यात येईल अशी माहिती सरचिटणीस दीपक सावंत यांनी दिली .