-3.8 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

पोलीस निरीक्षक अमित यादवं यांनी स्वीकारला संगमेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार 

संगमेश्वर : पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची रत्नागिरी सायबर पोलीस ठाणे येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अमित यादव यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांनी शनिवार २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक पदभार स्वीकारला. या वेळी त्यांचे संगमेश्वर व्यापारी तसेच प्रतिष्ठित व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी बुके देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमित यादव हे कोल्हापूर येथील असून त्यांनी सन.२००८ ते २०१० पोलीस उपनिरीक्षक ट्रेनींग पूर्ण केले.व २०१० ते २०१३ पर्यंत नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणुन काम केले.२०१४ मुंबई येथे अंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी विभाग २०२० साली कमांडो फोर्स या ठिकाणी कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस पोलीस ठाणे, वैभववाडी पोलीस ठाणे तसेच कणकवली या पोलीस ठाण्यात २०२१ ते २००४ पर्यंत पोलीस निरीक्षक म्हणुन काम करताना त्यांनी अनेक गुन्ह्यांनाचा उलगडा केला होता. तसेच अवैद्य धंद्यावरही कारवाईचा बडगा उचलला होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!