10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

तांबोळी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान संपन्न

बांदा : तांबोळी येथे आज नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नवीन मतदार नोंदणी करता युवक-युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग पहावयास मिळाला. तसेच पत्ता व इतर बदल व दुरुस्ती करता देखील महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता शिबिरास मिळालेला प्रतिसाद पाहून पुन्हा एकदा असेच शिबिर लावण्याचा विचार असल्याचे तांबोळी सरपंच सौ.वेदीका नाईक व आयोजक गुरु कल्याणकर यांच्याकडून सांगण्यात आले.परिसरातील नागरिकांनी सदर अभियान राबवल्याबद्दल आभार व आनंद व्यक्त केला.

यावेळी तांबोळी सरपंच सौ.वेदिका नाईक, गुरु कल्याणकर,दिलीप सावंत,निकिता येडवे,भास्कर सावंत, घनश्याम सावंत, हेमंत दाभोलकर व ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!