कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी ; कामांचा घेतला आढावा
कणकवली : गणेश उत्सव अवघ्या १५ ते १६ दिवसावर आला असल्यामुळे सर्वांचीच लगबग सुरू आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांची देखील लगबग सुरू असलेली दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेले प्रमुख राज्यमार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गयावर पडलेले खड्डे बुजवणे, रस्त्याच्या बाजूपट्टीवर वाढलेले गवत व झाडेझुडपे, साफसफाई करणे, अशा स्वरूपाची कामे आता वेगाने होऊ लागली आहेत.
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करत याबाबत सर्व अधिकारी, कर्मचारी व संबंधीत ठेकेदार यांना सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व लोकांशी VC द्वारे चर्चा करून लवकरात लवकर सर्व रस्ते खड्डे मुक्त व स्वच्छ-मोकळे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
कणकवली विभागातील नरडवे, कनेडी, फोडा रस्ता, कनेडी कुंभवडे रस्ता, कनेडी दिगवळे रस्ता, नागवे करंजे रस्ता, अशा अनेक रस्त्यांची पाहणी २२ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू , कनिष्ठ अभियंता करण पाटील, ठेकेदार अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते.