9.2 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

कलाकारांच्या खात्यात एकदम तीन महिन्यांचे १५,००० जमा

वेंगुर्ले : राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन महिन्यांचे १५००० जमा करून राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला.

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांचा सत्कार ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा व प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण याच्या हस्ते शाल व पुष्प देऊन कार्यालयात करण्यात आला. त्यामुळे कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी राज्यशासनाने आभार मानले.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी संतोष कानडे यांना अध्यक्ष व शैलेश जामदार यांना उपाध्यक्ष करुन त्याच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समिती गठीत केल्यावर दोन बैठकीत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २०० कलाकारांच्या प्रस्तावांना आतापर्यंत मंजुरी दिली. त्यामुळेच गेली ८ ते १० वर्षे प्रतिक्षेत असलेल्या गोर गरीब कलाकारांना न्याय मिळाला. त्यामुळेच कलाकारांनी धन्यवाद दिले. भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील लक्ष्मण गोविंद खानोलकर ( खानोली ) , संदिप रामचंद्र हळदणकर ( दाभोली ) , पांडुरंग नारायण मोंडकर ( आरवली ) , बस्त्याव बावतिस ब्रीटो ( उभादांडा ) , सुनिल नारायण तायशेटे ( परुळेबाजार ) , अरविंद सदाशिव नवार ( उभादांडा ) , प्रदिप मधुकर गवंडे ( परबवाडा ) , शामसुंदर वेणुनाथ कोळंबकर इत्यादी कलाकारांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , मा.सभापती निलेश सामंत , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , ता.चिटणीस समीर कुडाळकर ,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , दिंव्यांग आघाडीचे सुनिल घाग , किसान मोर्चाचे आरोलकर , महेश खानोलकर , संजु प्रभु , किशोर रेवंणकर , गजानन कुबल इत्यादी उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!