13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

विद्या मंदिर भोम प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

वैभववाडी : भोम येथे जाणता राजा प्रतिष्ठान ग्रामीण मुंबई यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवज्योत दौड काढण्यात आली. प्रतिष्ठानच्यावतीने १५ वर्षे विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात येते.

सकाळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी ९ वा. शिवज्योत दौडला भोम येथुन सुरुवात करण्यात आली. मौंदे, उपळे, तिरवडे, भुईबावडा, ऐनारी अशी दौड काढण्यात आली. या दौडमध्ये जाणता राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जयंततीनिमित्त वि.म.भोम व आखवणे, मौंदे या प्राथमिक शाळेत प्रतिष्ठाणच्यावतीने वह्या वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दत्ताराम बांद्रे, उपाध्यक्ष प्रल्हाद जामदार, सेक्रेटरी श्रीकांत कदम, सचिन तळेकर, सचिन जाधव, सचिन कदम यांच्यासह प्रतिष्ठानचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!