आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत ; उबाठा सेनेला जोरदार धक्का
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : पुरळ कळमई गावातील उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश म्हणजे आ. नितेश राणे यांचा उबाठाला जोराचा दणका मानला जातो. आ. नितेश राणे यांनी तेथील रखडलेली विकास कामे मार्गी लावली यामुळे आ. नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर खुश होऊन ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्वजण उबाठा सेनेचे कार्यकर्ते होते. या प्रवेशामुळे कळमई गावात आता शिवसेना शिल्लक राहिली नसून संपूर्ण गावच भाजपमय झाला आहे.
यावेळी पडेल मंडल विभागाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, प्रभारी डॉ. अमोल तेली, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, संजय बोंबडी, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
दिलीप दामाजी राघव, गजानन राघव, संदीप राघव, राकेश राघव, विश्वनाथ धुपकर ,कृष्णा राघव, विजय पुजारी काशिनाथ बापू पुजारे, सुरेश पुजारी संदीप संजय पुजारे, निवृत्ती पुजारे, रामचंद्र पुजारे, विश्वनाथ पुजारे, मंगेश मुळंम, शुभम चंद्रहास राघव, सहदेव राघव, विजय राघव, दयानंद राघव, शंकर राघव, रमाकांत राघव, विश्वनाथ मुळंम ,जयश्री राघव, संदेश राघव, दिपाली राघव, वैशाली राघव, सविता राघव, कार्तिकी मुळंम, चंद्रकांत मुळम, सुचिता मूळम, सुनील मूळम, प्रथमेश मूळम, संजय मूळम ,मानसी मूळम, सुलोचना मुळंम, साक्षी राघव, शेवंती राघव, सुधीर राघव, प्रदीप राघव, योगिता राघव, अनिकेत राघव, अभिषेक गजानन राघव, सुलोचना राघव, सुजाता राघव, विकास राघव, विलास राघव, गोपीनाथ राघव, सुगंधा राघव, विक्रांत राघव, गीता राघव, अनिल राघव, अनिता राघव, अमोल राघव, निखिल राघव, धोंडू धुपकर, शेवंती धुपकर, हर्षदा धुपकर, हरिश्चंद्र धुपकर, कविता राघव, प्रणिता राघव, हरेश मुळम, अश्विनी मुळम, श्रद्धा मुळम श्वेता मुळम सारिका मुळम, दिनेश राघव, महेश राघव यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला.