3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

तलावात आत्महत्या केलेल्या राकेशचा मृतदेह सापडला

सावंतवाडी : येथील मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या व्यापारी तथा राजकीय कार्यकर्ता राकेश याचा मृतदेह आज सकाळी तलावाच्या पात्रात आढळला. त्याने आत्महत्या नेमकी का केली? हे कारण मात्र अस्पष्ट आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. राकेश याने काल सकाळी येथील मोती तलावात आत्महत्या केली. हा प्रकार परिसरात असलेल्या न्यायालयातील काही कर्मचाऱ्यांनी पाहिला होता. मात्र शोधाशोध करून सुध्दा उशिरापर्यंत त्याचा मृतदेह आढळून आला नव्हता. त्यामुळे सायंकाळी उशिरा ही मोहीम थांबविण्यात आली होती.

मात्र तब्बल २४ तासाने आज त्याचा मृतदेह आढळून आला. राकेश सूर्यकांत नेवगी (वय ४२) रा.वैश्यवाडा असे त्याचे नाव आहे.सावंतवाडी शहरात त्याचे भुसारी दुकान आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. काल नेहमीप्रमाणे आपण दुकान उघडण्यासाठी जातो. असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने सावंतवाडीतील एका मंदिरात जाऊन अभिषेक केला होता. त्यानंतर आपल्या मित्राला भेटून तुम्ही भांडू नका. आता मी जातोय असे सांगितले. त्यानंतर येवून तलावात उडी मारली होती. मनमिळावू आणि नेहमी सर्वांना सहकार्य करणाऱ्या राकेशने हे पाऊल नेमके का उचलले? याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. राकेश याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सावंतवाडीतील भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचा तो चुलत बंधू आहे. त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर शहरातील व्यापारी वर्ग व मित्र परिवारात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!