कणकवली : भारतीय जनता पार्टी, कणकवलीच्यावतीने तालुक्यातील अवैध धंद्यां संदर्भात ३० मे २०२४ रोजी तालुका पदाधिकारी यांच्या वतीने अवैध धंदे वाढलेले आहेत. तालुक्यात चरस व गांजा विक्रीचे प्रमाण वाढत असल्याबाबत निवेदन दिले होते. यांचे वाढते प्रमाण या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, परंतु गेले तीन महीने या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. यावरून पोलीस प्रशासनाला याचे गांभीर्य दिसून येत नसून भविष्यात तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची होण्याची भिती आहे. त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. याकडे याचे गांभीर्य लक्षात येता भाजपाच्यावतीने कणकवली पोलीस स्टेशन समोर उपोषण छेडण्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री यांनी दिला आहे.
यावेळी कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांच्या समोर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. तरुण पिढी चरस गांज्याच्या आहारी गेली आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्ये रॅकेट पध्दतीने चरस गांजा विक्री होतो. तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची बाब भाजपा पदाधिका-यांनी लक्षात आणून दिली.
यावेळी भाजपाचे कणकवली शहराध्यक्ष सुरेंद्र कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, उपसरपंच सर्वेश दळवी, सागर पवार, सागर राणे, सुभाष मालंडकर, अभय गावकर, संतोष पुजारे, संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगांवकर, गोपीनाथ सावंत, नयन दळवी, प्रशांत राणे, आशिष राणे, प्रशांत सावंत, राजेश हिर्लेकर, विजय इंगळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.