8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

नाटळ ग्रामसभा मारहाण प्रकरणी एकाला सशर्थ जामीन मंजूर

कणकवली : नाटळ येथील ग्रामसभा चालू असताना पुर्ववैमनश्यातून फिर्यादी ग्रा.प. सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्या डोक्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला व किशोर परब, महेंद्र गुडेकर यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी ग्रा.पं. सदस्य सचिन पांडुरंग सावंत याची २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधिकश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी दिले.

आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि ३ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० वा नाटक ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्ती अध्यक्ष गणेश सावंत हा आपण दिलेल्या पत्रावर तात्काळ उत्तर द्या, असे बोलून तो सरपंच सुनील घाडीगावकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी फिर्यादी दिनानाथ सावंत हे अडवायला गेले. तेव्हा गणेश याने आणलेल्या धारधार चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर गंभीर वार केले.

यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अभिषण सावंत, पद्माकर पांगम, पंढरी पांगम, प्रदीप सावंत यांनी त्याला फिर्यादीला लाथाबुक्क्याने मारहाण केली. साक्षीदार किशोर परब व महेंद्र गुडेकर हे फिर्यादीला सोडविण्यासाठी गेले असता रमाकांत घाडीगांवकर सचिन सावंत, सुनिल जाधव, संजय सावंत, रमेश नाटळकर, अविनाश सावंत यांनी त्याना लाथाबुक्क्याने व प्लॅस्टिक खुच्यांनी मारहाण केली. त्यानुसार १३ आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ३५२, ५०४ ५०६, १४३,१४७, १४८, १४९ व पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. यापूर्वी दोन वेळा सदर आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर केलेला होता.

याप्रकरणी सचिन सावंत याच्यावतीने दाखल केलेल्या जामिन अर्जावर सुनावणी आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीची २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर सशर्थ मुक्तता करताना, साक्षीदारांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाब आणू नये. अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात सहकार्य करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!