3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

देवगड तालुक्यात गोवा बनावटीच्या दारू व आम्ली पदार्थांच्या विक्रीवर तात्काळ कारवाई करा

युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांचे पोलिसांना निवेदन 

देवगड : तालुक्यातील बऱ्याचशा खेडेगावात व शहरीभागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू व अम्ली पदार्थ विक्री होत असल्याचे आपल्याला वारंवार सांगितले आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केल्याचे निदर्शनास येत नाही. या गोवा बनावटीच्या दारूमुळे व अम्ली पदार्थाच्या विक्रीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत व तरुण पिढी या आम्ली पदार्थाच्या व्यसनामुळे बरबाद होत चालली आहे.

 

याबाबत तात्काळ कारवाई न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवसेना देवगड तालुक्याच्यावतीने पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रकणराची पोलीस निरीक्षक आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक जे नेहमी अमली पदार्थ प्रतिबंधात्मक करवाई करण्याचे आदेश देतात ते गंभीर्याने लक्ष देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!