4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

केसरकरांवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा राजकीय संन्यास घ्या

केसरकर समर्थकांचे संदीप गावडेंना आवाहन 

गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी बोलूच नये ; संजू परबांना नाव न घेता टोला..

सावंतवाडी : संदीप गावडे यांनी काल केसरकर यांच्यावर केलेले आरोप हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आवाहन केसरकर समर्थकांनी आज येथे केले. दरम्यान संदीप गावडे हे नाहक केसरकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांनी टीका करताना त्यांची राजकीय उंची पहावी असा पलटवार ही केसरकर समर्थकांनी आज येथे केला. तसेच गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी आमच्या नेत्यांवर बोलूच नये असा टोला हाणला. सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर समर्थक बोलत होते.ते पुढे म्हणाले की, सावंतवाडी मतदारसंघ हा सुसंस्कृत आणि संयमी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कोणावर टीका करून आपली राजकीय उंची वाढत नसून ती उलट कमी होते असा टोला देखील केसरकर समर्थकांनी गावडे यांना हाणला.

दरम्यान, आजपर्यंत आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे. परंतु, भाजपचे काही पदाधिकारी महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यापुढे जर आमच्या नेत्यांवर टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील केसरकर समर्थकांनी गावडे व तेली यांना दिला आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपली राजकीय उंच पहावी. दीपक केसरकर हे शांत व संयमी नेतृत्व आहे. त्यांना सावंतवाडी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आजपर्यंत ते तीन वेळा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांनी स्वतःच्या नगरसेवकांना देखील निवडून आणले आहेत. त्यामुळे गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी यापुढे जर केसरकरांवर टीका केली तर आम्ही ती खपवून घेणार नाही असा इशारा भारती मोरे यांनी संजू परब यांना नाव न देता दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!