-10.2 C
New York
Tuesday, January 21, 2025

Buy now

बेळणे चोरी प्रकरणामधील मुख्य आरोपीस ठाणे पाचपाखाडी येथून अटक

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाची धडक कारवाई

कर्ज झाल्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी करत होता चोऱ्या

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी फिर्यादी सतीश सिताराम दळवी ( वय ५६ वर्ष, रा. मुंबई मालाड, मूळ रा. बेळणे खुर्द, तालुका कणकवली ) यांच्या मालकीची बंद स्वरूपात असलेली फॅब्रिकेशन कंपनीमधील ८३ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरीतील मुख्य आरोपी नागेश चंद्रकांत बोभाटे ( वय २९ वर्षे, रा. तोंडवली, बोभाटेवाडी ) याला ठाणे पाचपाखाडी येथून अटक केली आहे. आरोपीने आपल्याला कर्ज झाल्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी चोऱ्या करत असल्याची प्राथमिक चौकशी कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेळणे येथील फॅब्रिकेशन मधील संशयित आरोपीने कटिंग मशीन, पॉवर प्रेस मशीनचे गियर, रॅम्, प्लेट, इलेक्ट्रिक मोटर, हॅन्ड प्रेस मशीन, पाईप बेंडिंग मशीनचे गिअरबॉक्स, इलेक्ट्रिक मोटर, बेडींग टूल, बेंच ग्रॅन्डर मशीन्स वगैरे साहित्य फॅब्रिकेशन कंपनीमधील ८३ हजार ५०० रुपयांचे चोरून नेले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी नागेश चंद्रकांत बोभाटे असून १७ ऑगस्ट रोजी कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी ठाणे पाचपाखडी येथून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेत रात्री अटकेची कारवाई केली आहे.

कर्ज झाल्याने शेअर मार्केटमध्ये खेळण्यासाठी करत होता चोऱ्या

या गुन्ह्यांमध्ये अगोदर आरोपी संदीप पांडुरंग चाळके (वय ३९ वर्षे, रा- बेळणे खुर्द, वरचीवाडी, ता. कणकवली) यास पोलिसांनी अटक केलेली होती. परंतु या गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी नागेश बोभाटे हा पोलिसांच्या निशाण्यावर होता. नागेश बोभाटे हा कर्जबाजारी होता तसेच त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्याचे व्यसन देखील जडले होते. त्या व्यसनांमधून त्याने सतीश दळवी यांच्या फॅब्रिकेशन कंपनीमधून वेगवेगळ्या मशिनरीचे लोखंडी पार्ट्स हे चोरी केले होते. गुन्हा घडल्यापासून तो पोलिसांना चकवा देत होता. कर्जबाजारी झाल्यामुळे मागील एक वर्षापासून राहते घरातून निघून गेला होता. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तांत्रिक तपासाद्वारे सदरचा आरोपी हा मुंबई, ठाणे परिसरात एका ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, बसस्थानके या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचे शोधून काढले. अखेर पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी पाचपाखडी, जिल्हा ठाणे परिसरात काल १७ ऑगस्ट रोजी पहाटेपासून सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. मध्यरात्री पोलिस ठाण्यास आणून चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!