कणकवली | मयुर ठाकूर : महाराष्ट्र राज्य महसूल पंधरावड्याच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील वागदे गावात ई-पीक पाहणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.शेतकरी स्वतः आपल्या पिकांची नोदणी कशी करू शकतो याचे मार्गदर्शन सत्र वागदे मध्ये राबवण्यात आले. यावेळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी क्षेत्रभेट घेत ई पीक पाहणी, मोबाईल ॲप पीक पाहणी नोंद याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी वागदे तलाठी मंगेश जाधव यांनी गावातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप वर नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन केले. शेतक-यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी वेळीच करावी.त्यामुळे पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती व अन्य योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे असे सांगितले.गावातील शेतकऱ्यांना एकजूट करण्याचे काम वागदे सरपंच संदीप सावंत यांनी केले. महसूल पंधरावड्या मध्ये शेतकऱ्यांच्या पीक पाहणी चे काम सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांनी शेतातच पिकावर त्याची नोंदणी ही पीक पाहणी ॲप मध्ये करणार आहे याचा उपयोग पुढे नैसर्गिक आपत्तीसाठी पिक विमा योजनेसाठी इतरांना होईल असे यावेळी सांगितले.
यावेळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे, वागदे सरपंच संदीप सावंत, निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव, गोदाम व्यवस्थापक दिलीप पाटील, मंडळ अधिकारी किरण गावडे, तलाठी मंगेश जाधव, ग्रामसेवक युवराज बोराडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम, पोलीस पाटील सुनील कदम व शेतकरी उपस्थित होते.