10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

बांगलादेशी नागरिकांच्या नोंदी ठेवा

बांदा नागरिकांचे पोलीस निरीक्षक बडवे यांना निवेदन

बांदा : बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची पूर्णपणे शहानिशा, खात्री करावी तसेच त्याचा आधारकार्ड पुरावा हा तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करून त्याची सविस्तर माहिती द्यावी, यासाठी आपण आपल्या स्तरावर उचित व तात्काळ कार्यवाही करावी अशी लेखी मागणी बांदा शहरातील नागरिकांनी आज बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे कि, बांदा शहरात अनेक परप्रांतीय चेहेरे हे मोठ्या संख्येने दृष्टीस पडत असून भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आपली स्थानिक पिढी ही अल्पसंख्यांक म्हणून गणली जाईल. यासाठी अशा परप्रांतीय बंगलादेशीचा शोध घ्यावा तसेच घर मालकांना भाडेकरू ठेवताना वरील नियमांबाबत अवगत करावे व सक्त सूचना द्याव्यात.

पोलीस निरीक्षक बडवे म्हणाले, आपल्या लेखी मागणीनुसार या संदर्भात ग्रामपंचायतला पत्र देण्यात येईल. घरमालकांनी भाडेकरू ठेवताना कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरताना परप्रांतीय आढळले तर याची तात्काळ माहिती बांदा पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन निरीक्षक बडवे यांनी यावेळी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, भूषण सावंत, सौ. गौरी बांदेकर, सुदन केसरकर, शैलेश केसरकर, निलेश मोरजकर, शैलेश लाड, नंदादीप केळुस्कर, प्रथमेश पडवळ, विराज देसाई, जयप्रकाश सावंत, संदीप नार्वेकर आदिसह बांद्यातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!