स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गची कारवाई
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ येथे गौरी अलंकार ज्वेलर्स मधून ९३ हजार रुपयांचे दागिने चोरणारी महिला होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सिंधुदुर्ग पोलिस पथकाने मुंबई सागाव, डोंबिवली ( पुर्व ) येथून अटक करण्यात आली आहे.ही घटना ३० जुलै रोजी दुपारी घडली होती. याची फिर्याद सुमित सुधीर मालडीकर, रा. फोंडाघाट, विद्यानगर याने दिली होती. त्यानुसार केलेल्या तपासातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गने चोरीचा छडा लावला आहे.
सदर गुन्हा करताना आरोपीत महिला हीचे CCTV फुटेज प्राप्त झालेले होते. परंतु ती अनोळखी असल्याने, तसेच गुन्हा केल्यानंतर लागलीच नजरेआड झाल्याने मिळून येत नव्हती. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा समांतर तपास करणेसाठी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे हेमचंद्र खोपडे यांनी नियुक्त केले होते. यात उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, नेतृत्वाखाली स.पो. फौ. गुरूनाथ कोयंडे, पोलीस हवालदार शप्रकाश कदम, आशिष जामदार, राजेंद्र जामसंडेकर श्रीम. रुपाली खानोलकर यांचे पथक कार्यरत होवून, सदर पथकाने प्राप्त CCTV फुटेजच्या आधारे गोपनिय माहिती घेतली व इतर गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीत महिलेचे नाव – गाव, ओळख करून सायबर पोलीस ठाणेच्या मदतीने तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. तांत्रिक तपासकामात सायबर पोलीस ठाणेचे प्रथमेश गावडे, स्वप्निल तोरसकर व श्रीम. धनश्री परब यांनी सर्वतोपरी मदत तांत्रिक तपासामध्ये आरोपीत महिला ही डोंबिवली परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. सदर माहितीचे आधारे तपास पथकाने तात्काळ डोंबीवली येथे जावून तिचा शोध घेतला. तीन ऑगस्ट रोजी सागाव, डोंबिवली ( पुर्व ) येथून ताब्यात घेतले. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणलेला आहे.