7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

“भगवा सप्ताह” खाली कणकवली विधानसभे ची प्रथम बैठक कळसुली जि. परिषद येथून सुरु – जिल्हाप्रमुख संदेश पारकर

भगवा सप्ताह अंतर्गत गाव तेथे प्रचार कमेटी नेमणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने कणकवली विधानसभे मध्ये कळसुली जिल्हा परिषद येथे भगवा सप्ताह ची प्रथम बैठक पार पडली.कणकवली विधानसभा मतदार संघातून कळसुली येथून भगवा सप्ताह ची सुरवात करण्यात आली. कळसुली जिल्हा परिषद च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये असे ठरवण्यात आले की प्रत्येक गावात प्रचार कमेटी नेमून, ज्या ठिकाणी रिक्त पदे असतील त्या ठिकानी पदाधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. येत्या कणकवली विधानसभे वरती भगवा फडकवन्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे आपण कणकवली मतदार संघात भगवा साप्ताहची सुरवात कळसुली जिल्हा परिषद येथून करत आहोत, जिल्हाप्रमुख म्हणून मी कणकवली विधानसभा मतदार संघात मालवण मध्ये भगवा सप्ताह सुरु करण्यासाठी जे काही प्रयन्त करावे लागतील ते आपण करूया व येत्या कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण सर्व जण सज्ज होऊया. पदाधिकाऱ्यांच्या बैठका गाव वार पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाचे महत्वाचे नेते असतील तालुका प्रमुख असतील यांची असेल. शिवसेना सभासद नोंदनी ५० हजार चा संकल्प देखील आपण करत आहोत, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यंत केले पाहिजेत. झालेल्या प्रराभवाचे शल्य न घेता येत्या विधानसभे वर भगवा फडकवूया.

यावेळी अतुल रावराणे यांनी देखील मार्गदर्शन केले, मागच्या विधानसभेच्या वेळी कमी कालावधीत कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत ही वाखण्य जोगी होती. ते मतदान उद्धव साहेबांवर विश्वास ठेऊन व तुम्ही घेतलेल्या मेहनतिमुळे मिळाली होती, त्याचउलट समोरच्यांना जे मतदान मिळाले आहे ते १०० कोटी च्या धनशक्ती वर मिळालेली मते होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!