मराठी हौशी नाट्य स्पर्धेत कांचन खानोलकर हिला अभिनय गुणवत्ता मिळाले पारितोषिक
कणकवली | मयुर ठाकूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या मराठी हौशी नाट्य स्पर्धेत कु. कांचन खानोलकर हिला अभिनय गुणवत्ता पारितोषिक प्राप्त होते. आपल्या अभिनयाने आचरेकर प्रतिष्ठान निर्मीत कृष्णकिनार या नाटकात राधा ही भुमिका साकारली होती. यासाठी हे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्याबद्दल आज संस्थेच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सल्लागार आणि मार्गदर्शक मा. लक्ष्मण प्रभू (गुरूजी) यांचे हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रसन्ना देसाई, कार्यवाह अॅड. देसाई युवा कार्यकर्ते सुयोग टिकले, पतांजली टिकले, अखिल आजगावकर, अक्षय आजगावकर, मंदार अवसरे, हजर होते.
संस्थेच्या वतीने आपण सर्वजण घरी येऊन माझा सत्कार केलात, त्यामुळे आनंद झाला. या सत्कारामुळे आता आणखी जोमाने काम करण्याची स्फूर्ती मिळाली आणि यापेक्षा चांगले काम करण्याची जबाबदारी पण वाढली आहे, असे कांचन हिने सत्कार नंतर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कांचन यांची आई आणि संस्थेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या लता खानोलकर यांनी संस्थेच्या वतीने ज्ञातीतील गुणवंतांचे कौतुक करणे, सत्कार करणे हे उपक्रम ज्ञातीच्या ऐक्य आणि उन्नती साठी चांगले आहेत असे गौरवोद्गार काढले.