पात्र उमेदवारांची जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी
मालवण : मालवण व कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झाले असल्याने अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मालवण तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे व प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांना दिले आहे.
यावेळी सुनील खरात, दशरथ गोवेकर, समीर परब, सारंगी चव्हाण, प्रियंका वाक्कर, मंगेश नाटेकर, चिन्मयी पाताडे, सोनाली माळगावकर, समिक्षा सुकाळी, ऐशाबी सय्यद, रंजर कोळंबकर, अक्षिता राणे, संग्राम कासले, भिकाजी परब, पंकज आंगणे, संदिप शिंदे, नितेश कुणकवळेकर, स्वप्नील मेस्त्री, किशोर गावडे, पल्लवी लाड, संदेश तळगावकर, प्रतिक्षा पालकर, सचिन आचरेकर, लक्ष्मण काळसेकर, सिध्देश साळकर, परेश भोगले, जान्हवी पांजरी, तृप्ती हडकर, गौरी चव्हाण, दिनेश सुर्वे, श्रीधर गोलतकर, हर्षद बेनाडे, समृध्दी अपराज, रोहन चौकेकर आदि उपस्थित होते.
मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरती २०२३ हा कार्यक्रम शासनाने निश्चित केलेल्या तारखांप्रमाणे योग्य प्रकारे पार पाडला आहे. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांसह प्रतिक्षा यादी १५ मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर ८ जुलै ते १८ जुलै या कालावधीत अंतिम कागदपत्र पडताळणी देखील पार पडली आहे. या भरती प्रक्रियेमधील सर्व उमेदवार निवड यादी प्रसिध्द झाल्यापासून नियुक्ती पत्राच्या प्रतिक्षेत आहोत. परंतु गेल्या तीन महिन्यापासून अद्याप पर्यंत आम्हाला नियुक्ती पत्र देण्यास विलंब होत आहे. आम्ही आमच्या हातातील कामधंदा सोडून भरती प्रक्रियेच्या आशेवर आहोत. गेल्या तीन महिन्यापूर्वी नियुक्ती पत्र देणे शक्य असताना तसे न केल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे पात्र उमेदवारांनी या निवेदनात म्हटले आहे.