28.1 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

अनेकांनी चुकीचे स्टेटस ठेवून महायुतीच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला

मनीष दळवीं यांचा राजन तेलींना नाव न घेता टोला

खासदार विजय होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मांडला अभिनंदनाचा ठराव

सावंतवाडी : अनेकांनी चुकीचे स्टेटस ठेवून महायुतीच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला. मित्र पक्षांकडून ही असा प्रयत्न झाला. तरीही भाजपने कोकणात मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला. असं टोला मनिष दळवी यांनी माजी आमदार राजन तेली यांचं नाव न घेता लगावला. दरम्यान कोकणात महायुतीचे खासदार विजय होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव त्यांनी मांडला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री खास. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप नेते महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजप नेते अशोक सावंत, रणजीत देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभाकर सावंत यांनी सादर केले. सुत्रसंचालन रविंद्र मडगावकर, आभार रुपाली शिरसाट यांनी मानले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!