8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

अंधार संपवून प्रकाश पसरवणे हे तर भाजपाचे ध्येयच – विशाल परब

नेमळे प्राथमिक उपकेंद्राला विद्युत इन्व्हर्टर दिले सप्रेम भेट

सावंतवाडी : सततच्या वादळी पावसामुळे व वाऱ्यामुळे नेमळे गावातील लाईट वारंवार खंडित होत असल्याने गावातील सर्वच नागरिकांना याचा त्रास होत  होता. नेमळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येणाऱ्या ग्रामस्थांना याचा सततचा होणारा त्रास लक्षात घेऊन नेमळे गावचे माजी सरपंच मा. विनोदजी राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेमळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांनी स्वखर्चाने विद्युत इन्व्हर्टर सेट उपकेंद्रास सप्रेम भेट देत नागरिकांची अडचण दूर केली आहे.

हा सेट उपकेंद्राला भेट देताना नेमळे गावातील भाजपा प्रमुख पदाधिकारी व तमाम कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सरपंच आणि भाजपा नेते श्री. विनोदजी राऊळ यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत आणि युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशालजी परब यांनी त्यांच्या आवाहनाचा सन्मान करत तातडीने गावासाठी केलेल्या या मदतीबद्दल सर्व नेमळेवासियांनी दोघांचेही आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!