15.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

स्वातंत्र्यदिनी उपोषणं होऊ नयेत यासाठी नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणार

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा अभूतपूर्व निर्णय : प्रशासनाला सूचना

निर्णयाचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी : स्वातंत्र्यदिन असो किंवा प्रजासत्ताक दिन जनतेला त्यांचे अधिकार आणि लोकशाहीने दिलेले हक्क याचे स्मरण करणारे हे राष्ट्रीय दिन असतात. मात्र, आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळेल या आशेने अनेक नागरिक प्रशासनाला पूर्वसूचना देऊन उपोषणाला याच दिवशी उपोषणाला बसत असतात. मात्र, लोकशाहीतील जनहिताच्या संकल्पनेला हे चित्र शोभा देणारे नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावर्षी अशा तक्रारी असणाऱ्या आणि उपोषणाची नोटीस दिलेल्या नागरिकांच्या तक्रारीबाबत तातडीने दखल घेऊन त्या सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.

जे विषय तातडीने सोडवता येतील ते ऑन द स्पॉट सोडवावेत ज्या तक्रारींना काही काळ लागणार असेल तर तो नेमका किती काळ लागेल हे स्पष्ट करत प्रशासनाने तक्रारदाराचे समाधान करावे अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. हे सरकार जनतेचे आहे, त्यांच्या कामाबाबत दिरंगाई आणि चालढकल यापुढे सहन करणार नाही, अशी कठोर भूमिका घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जनतेला दिलासा दिला आहे.

सामान्य जनतेला न्यायासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय जनतेप्रतीची त्यांची संवेदना दाखवून देणारा आणि अभूतपूर्व, ऐतिहासिक असा असल्याचे भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सांगत सिंधुदुर्गवासीय जनतेच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!