7.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

“माझी लाडकी बहिण” योजनेत प्रत्येक पात्र लहीलेचा सहभाग करून घ्या;आमदार नितेश राणे

सर्वाधिक लाभार्थी योजनेत सहभागी करणाऱ्या गावाला मिळणार २५ लाख रुपयांचा जादा विकास निधी

दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या गावांनाही १५ आणि १० लाख देणार विकास निधीचे बक्षीस

आमदार नितेश राणे यांची घोषणा

कणकवली तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कामाचा आमदार नितेश राणे यांनी घेतला आढावा

सरपंच, अधिकारी , कर्मचा-यांशी साधला संवाद

कणकवली : महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही अतिशय महत्वकांक्षी योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक उन्नती सोबतच स्वावलंबी बनवण्याचा उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना अंमलात आली. कणकवली तालुक्यात लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या गावांमध्ये सर्वाधिक लाभार्थी असतील त्या पहिल्या नंबर येणाऱ्या गावाला २५ लाख , दुस-या गावाला १५ लाख , तिस-या गावाला १० लाख असा जास्तीचा विकास देणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली. त्यासाठी सकारात्मकदृष्ट्या सर्वच गावांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कणकवली पंचायत समिती येथील प.पु. भालचंद्र महाराज सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कणकवली तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते , या बैठकीला कणकवली प्रांताधिकारी जगदीश काटकर , तहसिलदार दीक्षांत देशपांडे , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग , महिला बालकल्याण अधिकारी उमा हळदोणेकर व तालुक्यातील सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , नगरपंचायत कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या आढावा सभेत आ. नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना महिलांसाठी महत्त्वाची आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला संख्येने जास्त आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी होण्यासाठी सर्व सरपंच व ग्रामसेवक , अंगणवाडी सेविकांनी काम करावे. ज्या गावांमध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले. पुढच्या १५ दिवसानंतर पुन्हा बैठक घेतली जाईल.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.इंटरनेट सुविधांबाबत अडचणी असल्यास पंचायत समितीने त्या ग्रामपंचायतींना पर्यायी व्यवस्था करुन द्यावी . अशी सुचना आ. नितेश राणे यांनी केली.

बॉक्स

१६ हजार ६३६ ऑफलाईन अर्ज जमा;प्रांताधिकारी जगदीश कातकर

बैठकीत प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी माहिती देताना म्हणाले,६४ ग्रामपंचायत २८ हजार ३४८ कुटुंब आहेत त्यात २० हजार ३१८ कुटुंब पात्र ठरवली आहे. त्यापैकी १६ हजार ६३६ ऑफलाईन अर्ज जमा झाली आहेत. त्यापैकी १५ हजार ३८८ अर्ज ऑनलाईन झाले आहेत. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांकडे या योजनेचे अर्ज प्राप्त आहेत.

कणकवली शहरात अंगणवाडी सेविका व नगरपंचायत कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.कणकवली शहरात १४३५ ऑनलाईन अर्ज आले आहेत. ब-याच अटी या योजनेतील शिथिल केल्यामुळे आता तालुक्यात २८ हजार ३४८ कुटुंब संख्या पात्र होती . सर्व पात्र महिलांना लाभ होणार आहे. पांढरे रेशनकार्ड असलेल्या महिलांना अडीज लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्याचा दाखला दिला तर ती महिला लाभार्थी होईल.असे सांगितले.या आढावा बैठकीत फोंडा , कलमठ , सांगवे , तळेरे व अन्य काही ग्रामपंचायत मध्ये कशापध्दतीने अर्ज दाखल केले. याबाबत मार्दगर्शन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!