-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

चालत्या गाडीने घेतला अचानक पेट

देवगड : रस्त्यावर गाडी चालवत असताना अचानक शॉर्टसर्किटने गाडीला आग लागल्याची घटना देवगड तालुक्यात घडली आहे

मुणगे लब्देवाडी येथील महेंद्र यशवंत नाटेकर यांच्या चालत्या व्हॅगनार कारला (एम. एच. ०१, ईई ०३१७) शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास अचानक आग लागून कार आगीत पूर्णतः जळाली. ही घटना मशवी तिठा ते नारिंग्रे येथे घडली. गाडी चालवत असलेले नाटेकर यातून सुखरूप बचावले आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. नाटेकर हे आपल्या ताब्यातील व्हॅगनार कारने शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास मुंबई येथे नि घाले होते. त्यांची कार मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर आली असता कारच्या पुढील भागातून आगीच्या ठिणग्या उडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते तात्काळ कारमधून खाली उतरले. मात्र याचदरम्यान गाडीने पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

या घटनेची फिर्याद श्री. नाटेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!