शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने कुडाळ प्रांत कार्यालयात दिली धडक
कुजलेल्या धान्यामुळे दुर्गंधीमुळे मुलांच्या आरोग्याला धोका
कुडाळ तहसिलदार वसावे यांनी न्यायालयीन बाबी पडताळून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले
कुडाळ : कुडाळ तालुका बॅ नाथ पै हायस्कूलमधील गेल्यावर्षी पोषण आहार गैरमार्गाने विकला जातो याचा पर्दाफाश शिवसेना नेते अतुल बंगे, राजु गवंडे, नगरसेवक उदय मांजरेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. तसेच न्यायालयात केस सुरु असताना सदर पोषण आहार जप्त करण्यात आला होता. त्या प्रत्येक पोषण आहाराला आता एक वर्ष उलटुन गेले. त्यातच गेले २० दिवस मुसळधार पावसामुळे या शाळेमध्ये पावसाने पाणी असल्याने पोषण आहार कुजून किडे पडून दुर्गंधी पडल्याने मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. याबाबत मुख्याध्यापक प्रेम राठोड आणि अन्य शिक्षक यांनी न्यायालयात तसेच जिल्हाधिकारी व पुरवठा विभाग यांचेशी पत्रव्यवहार करुन ही वस्तुस्थिती लक्षात आणत कुडाळ प्रांत यांनी कार्यवाही करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवसेना नेते अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ प्रांत कार्यालयात धडक देऊन नायब तहसीलदार पवार यांच्याशी चर्चा करुन कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे यांची भेट घेऊन कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आली. उद्या गुरुवारी संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करुन कुडाळ पोलीस, नगरपंचायत, आरोग्य विभाग यांचे सहकार्य घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवा सेनेचे राजू गवंडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर, कुडाळ युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, आमदार वैभव नाईक यांचे स्विय्य सहाय्यक धिरेंद्र चव्हाण, युवासेनेचे अमित राणे, संदेश सावंत, सुशिल चिंदरकर, नगरसेवक उदय मांजरेकर आदी उपस्थित होते.