3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

महावितरणचे कार्य, अभियंता बाळासाहेब मोहिते यांची बदली

कणकवली : महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची कराड येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील सौरभ माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. मोहिते यांनी गेली पाच वर्षे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून अत्यंत लोकाभिमुख काम केले होते. तोक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड हानी झाली होती. त्या काळात महावितरणचा वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला होता. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी श्री. मोहिते यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

गेल्या पाच वर्षात पावसाळ्याच्या व इतर कालावधीत झालेल्या परिस्थितीत निर्माण आपत्कालीन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी श्री. मोहिते हे नेहमीच कार्यतत्पर राहिले. मंगळवारी त्यांनी पदभार सोडला आहे. दरम्यान त्यांच्या जागी सांगलीहून येणारे सौरभ माळी यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत कणकवली येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून काम केले होते. त्यांना या परिसराची व कामकाजाची चांगली माहिती असल्याने ते देखील यशस्वीपणे कारभार सांभाळतील, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!