कणकवली : हळवल येथील सौ. रोहिणी गंगाधर सावंत (वय,८४) यांचे मुंबईत उपचार सुरू असताना २९ मार्च रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांना गेली काही वर्षे गुडघे दुखीचा त्रास सुरू होता. या आजारावर उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक लेखक प्रा.जी.ए.सावंत यांच्या त्या पत्नी होतं.
जी.ए. सरांच्या व्यासंगात खंबीरपणे साथ देतानाच त्यांनी हळवल पंचक्रोशीत सर्व सामान्यांना मदतीचा हात दिला होता. अनेक परिवार सौ. सावंत यांच्या आपुलकीच्या नात्याने जोडले गेले होते. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सौ. रोहिणी सावंत यांच्या पश्चात पती जी.ए.सावंत सर, दोन मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. दापोली येथील प्रसिद्ध उद्योजक विवेक सावंत तर मुंबई येथे कार्यरत असणारे संतोष सावंत यांच्या त्या आई होतं.