-4.6 C
New York
Wednesday, January 15, 2025

Buy now

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करताय? ही आहेत सर्वोत्तम ठिकाण

न्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत. त्यामुळे बरेच लोकं प्रवासाचे नियोजन करतात. मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण गावी जातात. तर काही लोकांना इतर ठिकाणी फिरायला जायला आवडते.

तुम्ही देखील कुटुंबासह सहलीचे नियोजन करत असाल.

तुम्हीही कुठेतरी प्रवासाची तयारी करायची असेल तर आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर आणि उत्तम ठिकाणे सांगणार आहोत. तुम्हाला भारतात उन्हाळ्यात कुठे भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भेट देण्याची चांगली ठिकाणे सांगणार आहोत.

उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

मे-जून महिन्यात कडक उन्ह असते. या काळात बहुतेक लोकांना थंड ठिकाणी जायला आवडते. मग तुम्ही मनाली, शिमला, नैनिताल, औली, लडाख, काश्मीर, दार्जिलिंग, गंगटोक, उटी, गुलमर्ग, मसुरी या ठिकाणी फिरायल जावू शकता. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या यादीत या जागांचा समावेश करू शकता.

तुम्हाला जर दिल्लीला फिरायला जायचे असेल तर तुम्ही नीमराना किल्ला, अलवर, भानगड, मुर्थल, दमदमा तलाव, आग्रा, मथुरा, वृंदावन अशा ठिकाणी जावू शकता. आग्रा-मथुरा या ठिकाणी अनेकांना जायला आवडते. औली, डलहौसी, खज्जियार यांसारख्या ठिकाणी तुम्ही कुटुंबासह जाऊ शकता.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लोकं गोवा, ऋषिकेश, अलेप्पी, जयपूर, उदयपूर, दार्जिलिंग, पाँडिचेरी, कसोल, पुष्कर, नैनिताल, जैसलमेर, उटी, मॅक्लिओडगंज, गोकर्ण, लोणावळा, महाबळेश्वर, कोडाईकनाल, आग्रा, जयपूर यासारख्या ठिकाणी फिरायला जातात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!