जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेचे शिक्षणाधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांकडून कौतूक
कणकवली : मतदानाच्यावेळी ‘ईव्हीएम’मधून मतदानानंतर येणारा ‘बीप’चा आवाज मंगळवारी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये वारंवार येत होता. कारणही तसेच होते. विद्यामंदिर येथे शालेय स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. शाळेची निवडणूक हा तसा बातमीचा विषय नगण्यच म्हणावा लागेल. मात्र विद्यामंदिर हायस्कुलमधील ही शालेय निवडणूक नक्कीच जागळा वेगळा प्रयोग होता. जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येते त्याप्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेता दस्तुरखुद्द शिक्षणाधिकारी, निवडणूक नायय तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी आदी मान्यवरांनी मेट देऊन कौतूक केले. विद्यामंदिर हायस्कूलब्या शालेय स्वराज्य मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांमधून ९ पदांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये मुख्यमंत्री, सांस्कृतिक, क्रीडा, सहल असे मंत्री व उपमंत्रीपदे होती. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. सोबत काही ओळखपत्र, संमतीपत्र बगैरे कागदपत्रेही जोडण्यात सांगण्यात आले होते, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासही मुदत देण्यात आली. काही अपुरे, उशिरा आलेले अर्ज याश्ही ठरविण्यात आले. त्यानंतर विद्याव्यांना प्रचारासाठीही दोन दिवस वेळ देण्यात आला. उमेदबार असलेला विद्यार्थी वर्गावर्गात जाऊन आपणास मत का धाये, याचा प्रचार करत होता.
विशेष म्हणजे या निवडणूक प्रक्रियेचे न्यूज अँकरसह ‘व्हीएम’ न्यूज बॅनरखाली बातमीपत्रही करण्यात आले. त्यात निवडणुकीत्साठी आदर्श आचारसंहिताही जारी करण्यात आली होती. मंगळवारी प्रत्यक्ष निवडणुकीवेळी शाळेत ८३५ मतदारांसाठी दोन बुथ करण्यात आले होते. एका सुधार पाचवी ते आठवी तर दुसऱ्या बुधयर नववी व दहावीचे मतदार मतदान करणार होते. प्रत्येक टेबलवर केंद्राध्यक्ष, पोलिंग एजंटसह कर्मचारीही तैनात होते. विद्यार्थ्यांमधूनय पोलीस शिपाई असे कर्मचारी तैनात होते. पोलिंग एजंटसाठीही फॉर्न भरून प्रतिनिधी नेमण्यात आला होता. बोटाला शाई लावण्यापासून ते त्याचे ओळखपत्र तपासून सही घेण्यापासून सर्व प्रक्रिया अगदी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राबविण्यात आली होती. उमेदबार असलेल्या विद्याथ्यांनी मतदानावेळी मतदान केंद्रांबर प्रचार करू नये यासाठी निबंध पालण्यात आले होते.
प्रत्यक्ष मतदानावेळी नऊ उमेदवारांसाठी नऊ मोबाईल ठेवण्यात आले होते. या मोबाईलवर ‘ईव्हीएम’चे एक अॅप ठेवण्यात आले होते. या अॅपमध्ये निवडणुकीला उमे असलेले उमेदवारांचे नाव व फोटी होता. आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर मोबाईलला स्पर्श करताच ‘बीप असा आवाज येऊन मतदान होत होते. एका मतदाराने मतदान केल्यानंतर कर्मधारी पुन्हा ‘ईव्हीएम’प्रमाणे पुढील मतदानासाठी अॅप सज्ज ठेवत होता, मतदानाची टक्केवारी निवडणूक कार्यालयात देण्यात येत होती. यात मुलगे किती व मुली किती, हे देखील सांगण्यात येत होते. दर एक तासानी मतदानाची झालेली आकडेवारी जाहीर करण्यात येत होती. विजयी उमेदवाराला देण्यासाठी प्रमाणपत्रही तयार करण्यात आले होते.
शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, निवडणूक नायब तहसीलदार प्रिया हर्णे- परब, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आदींनी या संपूर्ण प्रक्रियेला भेट देऊन कौतुक केले. श्री. कुडाळकर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विधारून आपलेपणाने माहिती घेतली. सध्या शिक्षण सप्ताह सुरू असताना मातीलच पायाभूत प्रेरणा देणारा असा उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षणाधिकान्यांनी कौतूक केले. विशेष म्हणजे ही प्रक्रिया राबविताना अगदी सुक्ष्म नियोजन करण्यात आले. त्याबद्दल शिक्षक, विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रिया हर्षे यांनी प्रशासन शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करत असते. त्यात अशा उपक्रमांमुळे विद्याथ्यांमध्ये व त्यांच्याद्वारे समाजात मतदानाची जागृती होते. विद्यामंदिर प्रशालेचा हा उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका श्रीमती जाधव, शिक्षक सिंगनाथ, शर्मिला केळुसकर, नेताजी जाधव, पृथ्वीराज बर्डे, बिद्या शिरसाट, श्रीमती हरमलकर, जे. जे. शेळके, अच्युत वणवे आदी शिक्षकांनी मेहनत घेतली.