0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

अल्पवयीन युवतीशी शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीला न्यायलयीन कोठडी

कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे यांच्या पथकाच्या कामगिरीचे कौतुक

कणकवली : तालुक्यातील एका गावामधील अल्पवयीन युवतीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कणकवली पोलिसांनी कोल्हापूर करवीर येथून २२ जुलै राजी मध्यरात्री २ वा. च्या सुमारास संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली होती. ही घटना १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत घडली होती. याप्रकरणी त्या अल्पवयीन युवतीच्या तक्रारी वरून कोल्हापूर करवीर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासासाठी झिरो नंबर ने १५ जुलै रोजी हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर कणकवली पोलिसांनी कोल्हापूर येथून संशयित आरोपीस अथक प्रयत्नाने निष्पन्न करून आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, महिला पोलीस सुप्रिया भागवत यांच्या पथकाने केली होती. या प्रकरणाचा अधिकारी अधिक तपास श्री. मुंढे करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!