0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

नांदगाव पंचक्रोशीतील विज वितरणच्या विरोधात ग्राहक आक्रमक

कणकवली : तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नळपाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच श्री गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने गणेशचित्र शाळेत रात्रंदिवस लगबग सुरू आहे. त्यात वारंवार विज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणांना याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नांदगाव पंचक्रोशीतील विज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेत कनिष्ठ अभियंता श्री पंडित यांची भेट घेत लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे. यावेळी आठ दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीतपणे करण्याचे आश्वासन श्री. पंडित यांनी दिले. यावेळी विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, प्रदीप हरमळकर, नांदगाव तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे, संतोष मिराशी, आयनल माजी सरपंच बापू फाटक, राजू खोत, योगेश सदडेकर, भुपेश मोरजकर, मारुती मोरये, रामा मोरये, रघुनाथ लोके, विजय आचरेकर, कमलेश पाटील, कृष्णा वायंगणकर आदी बहुसंख्येने विज ग्राहक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!