कणकवली | मयुर ठाकूर : भारतात पूर्वीच्या काळापासून गुरु- शिष्य परंपरा आहे. पूर्वी शिष्याला सर्व त्याग करून गुरूंकडे जावे लागत होते. गुरुकुल पद्धत केली पण गुरु- शिष्यचे नातं तसेच घट्ट राहिले. असाच गुरुप्रती कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
आयुष्यात लहाणपणापासून ते आतापर्यंत आई -वडील या गुरूंनंतर विद्यार्थी वर्गाचे नातं शिक्षकांशी येते. आपल्या गुरुविषयी कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी बाल शिवाजीच्या विद्यार्त्यांनी गुरु ईश्वर तात माय, गुरु विण जगी कोण थोर या गुरुस्तवानाने गुरूंना मान वंदना दिली. सर्वप्रथम शाळा संस्था संचालक संदीप सावंत यांनी व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पद्यपूजन केले.त्यानंतर शिष्यानी गुरुप्रती आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या.
यांनंतर दहावीच्या विद्यार्थांनी शाळेच्या संस्थापिका सुलेखा राणे यांचे पद्यपूजन करून आपले ऋण व्यक्त केले. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनमुळे आपण घडत गेलो, ही भावना, आपुलकी आणि या अविस्मरणीय सोहळ्याने सर्वांचे डोळे पाणावले. यावेळी संस्कृत शिक्षक अरुण वळजू यांनी विद्यार्थ्यांना वैदिक विषयी मार्गदर्शन केले. व्यासमुनीचे महत्व कथेच्या स्वरूपात मांडले.यावेळी संस्था संचालक संदीप सावंत यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा राणे, अश्विनी जाधव, जिष्णा नायर, संगीत शिक्षक श्याम तेंडुलकर,तबला शिक्षक श्रीपाद बाणे,आनंद मेस्त्री,मैथिली गवळी, वैदही गाडगीळ ,भाग्यश्री पाटील, आकांक्षा प्रभूपेंढारकर या शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अश्विनी जाधव आणि आभारप्रदशन हर्षदा रासम यांनी केले