0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

हत्तींचा मुक्त संचार ; दोडामार्ग शिरवल येथे वावर ; बागायतींचे नुकसान

दोडामार्ग | प्रतिनिधी : हत्तींनी आपला मोर्चा आता शिरवल गावाकडे वळविला आहे. भुकेलेला एक हत्ती दिवसाढवळ्या थेट गावातील मंदिराजवळ येऊन बिनधास्तपणे फिरू लागला. हत्तीचा हा प्रकार पाहून ग्रामस्थांचा भीतीने थरकाप उडाला. ग्रामस्थांनी आरडाओरड करून हत्तीला जंगलात पिटाळून लावले. मात्र, सदर हत्ती पुन्हा गावात येण्याची शक्यता आहे. तिलारी खोऱ्यात वावरणारे हत्ती आता तालुक्यातील अनेक गावात फिरू लागले आहेत. केर, मोर्ले परिसरात वावरणारे हत्ती तळकट व त्यानंतर शिरवलच्या दिशेने मार्गस्थ झाले. तेथे दाखल होताच हत्तींनी केळी व माडांच्या रोपांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. खाद्याच्या शोधात रात्री-अपरात्री बाहेर पडणारे हत्ती आता दिवसाढवळ्याही थेट लोकवस्तीत शिरकाव करू लागले आहेत. भुकेलेला एक हत्ती खाद्याच्या शोधात शनिवारी शिरवल गावातील मंदिराजवळ आला. मंदिराच्या परिसरात असलेले झाडीझुडपे तो मनसोक्त खात होता. मात्र त्याच दरम्यान तेथे आलेल्या ग्रामस्थांनी समोरील दृश्य पाहताच त्यांची भीतीने गाळण उडाली. याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी हत्तीला जंगलात पिटाळून लावले.

दरम्यान, काही ग्रामस्थांना हत्तीची छबी व व्हिडिओ करण्याचा मोह आवरला‌ नाही. त्यांनी हत्तीला मोबाईलमध्ये कैद केले. हत्ती आता थेट लोकवस्तीत येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!