24.6 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

उद्धवसेनेचे नवीन पदाधिकारी नियुक्त

कणकवली : उद्धवसेनेकडून कणकवली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत, उपनेते, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये नाटळ विभागप्रमुख प्रदीप सावंत, कणकवली उपतालुकाप्रमुख बाबू पेडणेकर, कासार्डे-नांदगाव विभागप्रमुख तात्या निकम, तळरे पंचायत समिती मतदारसंघ उपविभाग प्रमुखपदी बाळा राऊत, कळसुली पंचायत समिती उपविभाग प्रमुखपदी मनोहर मालंडकर, फोंडा पंचायत समिती महिला उपविभाग प्रमुखपदी प्रतिमा अवसरे, कलमठ महिला विभागप्रमुख धनश्री मेस्त्री यांची नियुक्ती केल्याचे कळविले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!