ओरोस : डी एड बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. भर पावसात आंदोलन सुरू असलेल्या आंदोलकर्त्यांनी आज थाळीनाद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकपद भरतीत स्थानिक डी एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट सामावून घ्यावे. या मागणीसाठी डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज चौथ्या दिवशीही भर पावसात हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्यांना विविध पक्षाच्या नेत्यांनी भेटी देत आश्वासने दिली आहेत. मात्र ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. आज चौथ्या दिवशी या आंदोलनकर्त्यांनी थाळी नाद आंदोलन करून प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.