23.5 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

घंटानाद आंदोलनास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा

सावंतवाडी : प्रवाशांच्या होणाऱ्या या प्रचंड गैरसोयी व नाराजीबद्दल सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी उद्या दिनांक १८ रोजी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पाठिंबा असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर आंदोलनाला उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले आहे.

दरम्यान सावंतवाडी मतदार संघाचे तब्बल पंधरा वर्षे आमदार व साडेसात वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरील एसटी बस स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. आतापर्यंत मंत्री यांनी घोषणांचा फक्त पाऊस पडला आहे. मात्र प्रत्यक्ष सोयी सुविधा कधीच दिल्या नाहीत. असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्ष श्री दळवी यांनी यावेळी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!