25.1 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

पळसंब येथे गटविकास अधिकारी मोरे यांच्या हस्ते विठ्ठल पुजा

पळसंब : आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरचीवाडी येथे मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते बुधवारी सकाळीविठ्ठल रखुमाई ची विधीवत पुजा झाली. रखुमाई देवालय समिती पळसंब वरचीवाडी तर्फे आषाढी एकादशी निमित्त
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पहाटे नित्य पुजा. झाल्यानंतर सकाळी गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते शासकीय पुजा संपन्न झाली.

दिवसभर सरु असलेल्या कार्यक्रमात दुपारी दोन वाजता गुरुवर्य कमलेश मेस्त्री शिष्य वर्गाकडून भजन संध्या कार्यक्रम ,.सायंकाळी पाच वाजता सोहंम चिंदरकर,प्रणव चिंदरकर यांचा अभंगवाणी कार्यक्रम पखवाज साथ वेदांत चिंदरकर यांची लाभणार आहे. सायंकाळी सहा वाजता श्री रामेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ त्रिंबक बुवा सौ माधुरी त्रिंबककर यांचा भजनाचा कार्यक्रम, सात वाजता स्थानिक भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!