3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

वाभवे – वैभववाडीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचे नगरसेवक पद अबाधित

त्यांच्या विरोधातील अपात्रता अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला ; वकील उमेश सावंत यांचा युक्तिवाद

वैभववाडी – वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात महत्त्वपूर्ण माहिती लपवून निवडणूक जिंकली. तसेच सदस्य काळात अनाधिकृत बांधकाम केले. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी तक्रार उबाठा सेनेचे उमेदवार शिवाजी सखाराम राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. त्यांचा तो अर्ज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे संजय सावंत यांचे नगरसेवक पद अबाधित राहीले आहे. नगरसेवक संजय सावंत यांच्या वतीने एडवोकेट उमेश सावंत यांनी काम पाहिले.

सन 2021- 22 मध्ये वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत संजय सावंत व शिवाजी राणे यांच्यात प्रभाग क्रमांक 13 मधून लढत झाली होती. यात संजय सावंत हे विजयी झाले होते. त्यानंतर माहितीच्या अधिकारात वाभवे येथील घर नंबर 34 च्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सावंत यांनी नगरसेवक कारकिर्दीत अनधिकृत केले. तसेच निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात शासनाकडे अनधिकृत बांधकामाबाबत भरलेल्या दंडाचा व अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केलेला नव्हता. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी 19 जुलै 2023 रोजी सादर अहवालात घर नंबर 34 चे बांधकाम विनापरवाना असल्याचे नमूद केले आहे. अशी माहिती राणे यांनी शोधून काढली होती. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नगरसेवक पद रद्द करावे व अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची कार्यवाही करावी असा अर्ज राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या सुनावणीअंती कलम 44 ई प्रमाणे नगरसेवकांने त्यांच्या कारकिर्दीत सदरचे बांधकाम केल्याचा पुरावा न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचा अर्ज फेटाळून लावला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!