वैभववाडी | मयुर ठाकुर : शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर असून सिंधुदुर्ग पॅटर्न निर्माण झाला आहे. दहावी बारावी मध्ये मिळणाऱ्या यशामध्ये विद्यार्थ्यांनी सातत्य राखले पाहिजे. आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करून ते ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन त्यात यशस्वी झाले पाहिजे. असे प्रतिपादन उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील 10 वी. 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व 100 टक्के निकाल लागलेल्या माध्यमिक विद्यालयांचा सत्कार समारंभ वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारकर बोलत होते.
यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, रजब रमदुल, तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवा सेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, नगरसेवक मनोज सावंत, शहर प्रमुख शिवाजी राणे, कोळपे सरपंच सुनील कांबळे आदी पदाधिकारी तसेच तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
दहावी, बारावीत यश मिळवतो परंतु हे विध्यार्थी पुढे कुठे जातात. विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरून आपली गुणवता सिद्ध केली पाहिजे. शासकीय सेवेत जाऊन जिल्हाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. असे आवाहन केले.
तर यावेळी मार्गदर्शन करताना सतीश सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त पदवी घेऊन चालणार नाही तर इतर कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आज महाराष्ट्रात सिंधुदुर्गचा शैक्षणिक क्षेत्रात बोलबाला आहे परंतु दहावी-बारावीतील गुणवत्तेवर धन्यता मानून चालणार नाही, तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या संधी शोधल्या पाहिजेत. कौशल्य शिक्षणाचा अवलंब करून ज्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. अशी कौशल्य आत्मसात करावे. भविष्यातील नोकरीच्या व रोजगाराच्या संधी ओळखून त्यानुसार कौशल्य शिक्षण घेतले पाहिजे. तुम्हांला कोणीही राजकारणी नोकरी देऊ शकत नाही. तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल.
यावेळी सुशांत नाईक, रजब रमदुल, उंबर्डे मुख्याध्यापक राठोड, वैभववाडी मुख्याध्यापक नादकर, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विधार्त्यांना भेट वस्तू, प्रमाणपत्र, देऊन गौरवण्यात आले. तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वप्नील धुरी यांनी केले.