29.8 C
New York
Monday, July 14, 2025

Buy now

महामार्गावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी व कारमध्ये अपघात

एक गंभीर जखमी ; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस (मथुरा गंगाई हॉटेल) समोर ओव्हरब्रिजवर शनिवारी ( आज ) दुपारी कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार कणकवलीच्या दिशेने जात होती. तत्पूर्वी मुसळधार पाऊस कोसळल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. एवढ्यात आलेल्या भरधाव असलेल्या कार चालकालस उड्डाणपुलावरील साचलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि नियंत्रण सुटून कारची दुचाकीला धडक बसली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!