काही गाड्या केवळ सावंतवाडी पर्यंतच सुरू
प्रवाशांचे प्रचंड हाल ; रेल्वेगाड्या रद्द् केल्याने प्रवाशांना तिकीटाचा शंभर टक्के परतावा
कणकवली : दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमूळे पेडणे येथे बोगद्यामधील मार्गात मोठ्या प्रमाणात रेल्वे रूळावर पाणी व माती आल्यामुळे रेल्वे वहातूक बंद करण्यात आली . मंगळवारी देखील रेल्वे वाहतूक याच कारणामुळे बंद करण्यात आली होती. रात्री मार्ग सुरळीत करण्यात आला, मात्र पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल व माती रेल्वे रुळावर आल्यामूळे मंगळावारी मध्यरात्री ३ वाजता पुन्हा रेल्वे वाहतूक सेवा ठप्प करण्यात आली. त्यामुळे बुधवारी दिवसभर रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. तर काही रेल्वे गाड्या या केवळ सावंतवाडी पर्यंतच सुरू होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल देखिल झाले. तसेच रेल्वे प्रवासाठी काढलेली तिकीटे देखिल रेल्वेगाड्या रद्द् केल्याने रद्द् करण्यात आली व तिकिटांचा तिकीटाचा शंभर टक्के परतावा प्रवाशांना परत करण्यात आला असल्याची माहिती कणकवली रेल्वे स्टेशनच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या झालेल्या अडचणीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील एकूण तेरा गाड्या रद्द करण्यात आल्या. तर अकरा गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.
त्याचप्रमाणे मांडवी एक्सप्रेस व दिवा या मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द् करण्यात आल्या, असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तर जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, वंदे भारत या मुंबईवरून येणाऱ्या गाड्या देखिल रद्द करण्यात आल्या होत्या व हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम (मंगला एक्सप्रेस) पुणे-मिरज लोंढा मार्गे वळविण्यात आली, असल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील अडचण दूर झाल्यास सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर उभी करून ठेवण्यात आलेली कोकणकन्या व तुतारी एक्सप्रेस गाड्या मार्ग सुरळीत झाल्यावर आपल्या नियोजित वेळेत निघणार (मुंबईला जाण्यासाठी) असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
थोडक्यात माहिती
कोकण रेल्वे मार्गावर झालेल्या अचानक अडचणीमूळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.तर रेल्वेकडून मिळालेल्या माहिती नुसार ज्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली त्यापासून पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी बसची व्यवस्था करून देण्यात आली.