22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्त भागाची केली पहाणी

तातडीने पंचनामे करा ; प्रशासनाला दिल्या सूचना

खारेपाटण | मयुर ठाकूर : मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येथील मेडिकल, भूषारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देउन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. तसेच प्रशासकीय अधिकऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली. बाजारपेठेतील दुकांदारांशी खासदार नारायण राणे यांनी चर्चा करुन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.

यावेळी खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रशासनाला नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तसेच भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करून येणाऱ्या वर्षात मे महिन्याच्या आधी नदीचा गाळ काढला जाईल. तसेच कोणत्याही सूचना न देता सोडण्यात येणारं धरणाच पाणी इ कोणत्याही प्रकारच्या सूचना केल्याशिवाय सोडू नये यासाठी संबंधितांना सूचना केल्या जातील. तसेच बंधाऱ्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या वर्षात ते पूर्ण करून घेऊन असे आश्वासन खारेपाटण वासीयांना खासदार नारायण राणे यांनी दिले.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव व ग्रामपंचायत सदस्य, मा. जि. प सदस्य. रवींद्र जठार व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्राजल कुबल, सुधीर कुबल, राजू वरूनकर, शेखर शिंदे, शेखर कांबळी, उज्वला चिके, अविनाश गाठे, पिंटू सर्पे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!