मुंबई : मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळावर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या चार एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी सीएसएमटीवरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम झाला आहे.
सीएसएमटीवरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे चार तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत.