0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

गांज्यासह दोघे युवक पोलिसांच्या ताब्यात : एक दुचाकीही जप्त

मालवण : मालवण पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे मालवण आडारीवाडी मार्गांवर मालवण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघा युवकांना 470 ग्राम गांजासह ताब्यात घेतले. एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. विशाल वडर (वय 27,रा. पोईप), आदित्य नेरुरकर (वय 26, रा. विरण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयीत युवकांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे.

मालवण परिसरात घडलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पथकाने गोपनीय माहिती आधारे ही कारवाई केली. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आंनदा यशवंते, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, प्रतीक जाधव, राजाराम तेरेखोलकर, महादेव घागरे यांसह अन्य कर्मचारी सहभागी होते.

या प्रकरणी सखोल चौकशी सूरू असून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जात यात अन्य जे कोणी सहभागी असतील तर त्यांचाही शोध घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!