22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

विज चोरीप्रकरणी लोरे नं.१ मधील ग्राहकावर पोलिसात तक्रार दाखल

कणकवली : लोरे नं.१ मधील विश्राम आत्माराम राणे व त्यांची पत्नी सौ.वैशाली राणे यांची विज चोरीप्रकरणी कणकवली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास यशवंत बगडे यांनी कणवली पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
उपकार्यकारी अभियंता आपल्या फिर्यादित म्हणतात, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या आदेशानुसार लोरे नं.१ मधील विश्राम राणे यांच्या घरी विज मिटर तपासनीसाठी गेलो असता मिटर चेक केला परंतु तो नादुरूस्त आढळून आला. परंतु त्याचा घराच्या पाठीमागील बाजुस जाऊन पाहिले असता तेथे एक छोटी शेती दिसून आली. त्यामधील झाडे व रोपे यांना पाण्याच्या पंपाने पाणी देणे सुरू होते. सदरचा १ एचपी एवढ्या क्षमतेचा पंप होता. सदर मोटर मिटर अनधिकृतपणे तेथील ट्रान्सफॉर्मरच्या बाजुला असलेल्या छोट्या रूममधील थ्री फेज मिटरच्या इनकमिंगला प्रत्यक्षपणे सर्व्हिस वायर जोडून घेऊन विज चोरी करीत असल्याचे दिसून आले. या विज चोरीबाबत विश्राम आत्माराम राणे यांना कल्पना देण्यात आली. त्यांनी त्यावेळी ते मान्यही केले. त्यानंतर पंच संजय अनंत तेली रा. लोरे नं.१ व हनुमंत राजाराम पवार फोंडाघाट यांच्या समक्ष साक्षीने पंचनामा करून त्यांना एकूण बिल ३००२०/- दि.३० एप्रिल २०२४ रेाजी दिले. परंतु त्यांनी ते स्विकारल नाही. म्हणून लाईट वापरकर्ते विश्राम राणे व त्यांची पत्नी सौ.वैशाली राणे याच्याविरूद्ध विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे कायदेशीर तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!