23.5 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय…? | डीएड, बीएड वाल्यांना उध्वस्त केले

विनायक राऊत यांचा मंत्री केसरकरांवर आरोप 

सावंतवाडी : नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत सिंधुदुर्गातील फक्त ७ जणांना संधी मिळाली आहे. बाकीचे सर्व उमेदवार हे राज्यातील आहे. यावरुन सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय? असा सवाल करीत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगारांना उध्वस्त करण्याचे काम केले, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २२ शाळा धोकादायक स्थितीत आहेत. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम केले जात आहे. राज्याच्या इतिहासात पहिलेच शिक्षण मंत्री आहेत ज्यांना शिक्षणखात्याचा अर्थच कळला नाहीे हे आमचे दुदैव आहे, असे ही त्यांनी सांगितले. श्री. राऊत यांनी आज कोसळलेल्या जिल्हा परिषद शाळा नं. १ ची पाहणी केली. तेथील विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला तसेच त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या मुलांना पर्यायी जागेत बसवा, अशा सुचना केल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री केसरकरांवर जोरदार टिका केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!