18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

कुंडई ते पंढरपूर पायी वारीचे बांद्यात स्वागत

बांदा : संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय ,कुंडई – गोवाच्या वतीने कुंडई येथून पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पायी वारीचे बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात स्वागत करण्यात आले. संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय ,कुंडई तर्फे गतवर्षीपासून या पायी वारीचा आरंभ झाला असून यंदाचे वारीचे दुसरे वर्ष आहे. शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठुनामाच्या जयघोषात बुधवार दि.३ जुलै रोजी गोव्यातून आरंभ झालेल्या या वारीचे गुरुवारी सायंकाळी बांदा येथे संत सोहिरोबानाथ आंबिये मठ बांदा येथेे आगमन झाले.

यावेळी वारकऱ्यांनी वीठू नामाचा गजर करत फेर धरुन रिंगण केले. मठातर्फे पालखीचे पुजन तसेच वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी वारकऱ्यांनी संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांचे दर्शन घेतले.त्यानंतर नामस्मरण व आरती करुन तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले.अल्पोपहार करुन त्यानंतर पुढे जाऊन बांद्यातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले व वारी पुढे इन्सुली डोबाशेळ येथिल संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे मार्गस्थ झाली.या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!