22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

कलमठ गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अनिता गुरुनाथ कोरगावकर पहिल्या लाभार्थी

उद्या पासून होणार वाडीवार शिबिर ; सरपंच संदीप मेस्त्री यांची माहिती

कणकवली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कलमठ गावात अनिता कोरगावकर, निता राणे यांचे योजना अर्ज ग्रामपंचायत माध्यमातून भरण्यात आले अर्ज सबमिट झाले. यासाठी ग्रामपंचायतच्या डेटा ऑपरेटर अंकिता राणे यांनी मेहनत घेतली.

गुरुवारी ग्रामपंचायतमध्ये सरपंच संदिप मेस्त्री, मुख्यसेविका गीता पाटकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य पपू यादव, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री सर्व अंगणवाडी सेविका पूजा हुनरे, सुनीता पाटकर, दिव्या करंजेकर, राजश्री शिर्के, गौरी गवळी, शर्मिला चव्हाण, आरती गुरव, सोनाली मेस्त्री, निकिता कदम, रत्नवली लाड, शुभांगी सावंत उपस्थित होते. उद्या पासून वाडी निहाय नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!