संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विध्यार्थ्यानी चांगले शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन साईसिध्दी कंट्रक्शनचे मालक तसेच उद्योजक महेंद्र पालव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
पोईप येथील जि. प. प्राथमिक केंद्र शाळा नं. १ प्राथमिक शाळा भटवाडी. प्राथमिक शाळा धनगरवाडी या तीन प्रशालेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. साईसिध्दी कंट्रक्शनचे मालक महेंद्र पालव यांच्या सौजण्याने सदरचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोईप गावचे सरपंच श्रीधर नाईक. पोईप विविध विकास सोसायटीचे माजी चेअरमन शंकर(बाळा) पालव. माजी उपसरपंच विलास माधव. मिलींद नाईक. सत्यवान पालव. अनिकेत सावंत अजय जाधव. मुख्याध्यापक श्री.विकास घाडिगावकर शिक्षक, विध्यार्थी व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे देखील गावातील विद्यार्थांना लागणारी मदत करण्यास आपण तयार असल्याचे महेंद्र पालव यांनी सांगितले.